वैभववाडीच्या बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची तोडफोड; शहरात खळबळ

0
82
वैभववाडीच्या बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची तोडफोड; शहरात खळबळ
वैभववाडीच्या बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची तोडफोड; शहरात खळबळ
वैभववाडीच्या बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची तोडफोड; शहरात खळबळ

वैभववाडी | प्रतिनिधी :
वैभववाडी नगर पंचायतीचे बांधकाम सभापती रणजीत तावडे यांच्या कारची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे वैभववाडी शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी रणजीत तावडे यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजीत तावडे यांचे वैभववाडी बाजारपेठेत चायनीज सेंटर आहे. सोमवारी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या दरम्यान दुकान बंद करून ते घरी गेले. त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे त्यांनी घरापासून काही अंतरावर रस्त्याच्या कडेला आपली व्हॅगनार कार उभी केली होती.
दरम्यान, रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा भाऊ घरी आला असता कार सुस्थितीत होती. मात्र मंगळवारी सकाळी कामगारांच्या निदर्शनास कारची मागील काच फोडलेली आढळून आली. यानंतर तात्काळ तावडे यांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर रणजीत तावडे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना रणजीत तावडे म्हणाले की, “आपले कोणाशीही राजकीय वैमनस्य नाही. तरीदेखील अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करून शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. तसेच परिसरातील खासगी घरांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत,” अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
या घटनेचा पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here