व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम

0
7
व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम
व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम

व्हाईस ऑफ मीडियाच्या कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम

खोपोली l शुभम प्रतिभा पांडुरंग गवस                                                                                                                                                      व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने खोपोली येथे आयोजित कोकण विभागीय कॅडर कॅम्पमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टीमने प्रथम क्रमांक पटकावला. पत्रकारिता आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे देत टीमने आपल्या ज्ञानाची व संघभावनेची छाप उमटवली.
दोडामार्गच्या टीमच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने ही कामगिरी केली. जिल्हाध्यक्ष भूषण सावंत, कार्याध्यक्ष संजय पिळणकर आणि तालुकाध्यक्ष आपा राणे यांच्या नेतृत्वाखाली टीमने सहभाग घेतला. यावेळी डिजिटल विंगचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद गवस, गोविंद शिरसाट, शिरीष नाईक, रामचंद्र ठाकूर, प्रथमेश नाईक, नारायण नाईक आदी पत्रकार उपस्थित होते.
या कॅम्पला व्हाईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चौडलिया, पत्रकार अजित चव्हाण, डिजिटल विंगच्या संघटक रश्मी मारवाडी आणि कुमार कडलक यांची उपस्थिती होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळविलेल्या या यशामुळे जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या कामगिरीचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here