शरद पवारांच्या पठ्यानं विदर्भात इतिहास घडवला !

0
92
शरद पवारांच्या पठ्यानं विदर्भात इतिहास घडवला !
शरद पवारांच्या पठ्यानं विदर्भात इतिहास घडवला !

शरद पवारांच्या पठ्यानं विदर्भात इतिहास घडवला !

२१ वर्षीय सौरभ तायडे सिंदखेडराजाचे सर्वात तरुण नगराध्यक्ष

बुलढाणा : विदर्भाच्या राजकारणात नवा इतिहास घडवत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नगर परिषद निवडणुकीत अवघ्या २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी नगराध्यक्षपदाची बाजी मारली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सौरभ तायडे यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीत विशेष बाब म्हणजे प्रचारादरम्यान शरद पवार गटाच्या कोणत्याही प्रमुख नेत्याची सभा सिंदखेडराजा येथे झाली नव्हती. उलट, शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची येथे प्रचारसभा पार पडली होती. तरीही स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत सौरभ तायडे यांनी मतदारांचा विश्वास संपादन केला आणि अखेर विजय खेचून आणला.

विजयानंतर माध्यमांशी बोलताना सौरभ तायडे यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली. “आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित विकास केला नाही. त्यामुळे येत्या काळात शहराच्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देणार आहे. रस्ते, आरोग्य सेवा आणि पाणीपुरवठा हे माझे प्राधान्याचे विषय असतील,” असे त्यांनी सांगितले.

तसेच सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक वास्तूंशी संबंधित विकास आराखड्याचा पाठपुरावा करून शहराच्या सांस्कृतिक व पर्यटन विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचेही तायडे यांनी स्पष्ट केले.

अवघ्या २१ व्या वर्षी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सौरभ तायडे यांच्या विजयामुळे विदर्भाच्या राजकारणात तरुण नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here