शरद पवार यांचा २ व ३ ऑक्टोबरला पुरंदर-बारामती दुष्काळ पाहणी दौरा

0
13
शरद पवार यांचा २ व ३ ऑक्टोबरला पुरंदर-बारामती दुष्काळ पाहणी दौरा
शरद पवार यांचा २ व ३ ऑक्टोबरला पुरंदर-बारामती दुष्काळ पाहणी दौरा

शरद पवार यांचा २ व ३ ऑक्टोबरला पुरंदर-बारामती दुष्काळ पाहणी दौरा

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करणार

पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार हे २ व ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पुरंदर आणि बारामती तालुक्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेणार असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील विविध भागांना भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधून पाणीटंचाई, शेती आणि स्थानिक परिस्थितीची माहिती घेण्याचे नियोजन आहे. या पाहणीदौऱ्यातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘जबाबदारी खांद्यावर’ आणि ‘राष्ट्रवादी बांधावर’ हे अभियानात्मक हॅशटॅग वापरण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here