‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती

0
24
‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती
डिजिटल शिक्षणाला चालना देणाऱ्या ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन
पनवेल –
शाळेतलं पहिलं पाऊल खास, नवीन स्वप्नांचं नवं आकाश” या भावनेतून पी.एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती लावली.

यावेळी आमदार महेश बालदी, रामशेठ ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या ‘आयडियल सेंटर’ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत शिक्षण क्षेत्रातील बदलांबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेल्या शैक्षणिक परिवर्तनाचे कौतुक केले. दर्जेदार शिक्षण, आधुनिक सुविधा आणि सकारात्मक बदलांमुळे अनेक ठिकाणी खासगी शाळांमधूनही विद्यार्थ्यांचा कल पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेली अत्याधुनिक डिजिटल लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे शिक्षकांना अधिक प्रभावी अध्यापन करता येईल आणि विद्यार्थ्यांना अधिक सुलभपणे अध्ययन करता येणार आहे. तसेच ऑनलाइन परीक्षा व्यवस्थेमुळे शिक्षण प्रक्रियेला अधिक गती आणि गुणवत्ता प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, हक्क आणि कर्तव्यांची जाणीव, स्वच्छतेची सवय, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजणे आवश्यक आहे. भविष्यात जबाबदार, सुजाण आणि उत्तम नागरिक घडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here