शाश्वत ऊर्जेवर आणि औद्योगिक विस्तारावर फडणवीस–ह्योसुंग यांच्यात चर्चा

0
34
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एचएस ह्योसुंगचे सीईओ व उपाध्यक्ष एच. एस. चो यांच्यात शाश्वत व सक्षम ऊर्जा प्रणालींकडे होत असलेल्या जागतिक संक्रमणावर तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत स्वच्छ ऊर्जा, भविष्यसज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा आणि राज्याच्या दीर्घकालीन औद्योगिक धोरणाशी निगडित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. या चर्चेत अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचाही विशेष उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी मजबूत आणि सर्वसमावेशक वस्त्रोद्योग पार्क परिसंस्था विकसित होत असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उद्दिष्टे साध्य करताना आणि मोठ्या उत्पादन केंद्रांना ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करताना अशा उच्चस्तरीय संवादांना विशेष महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. अमरावतीतील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कसारख्या प्रकल्पांचा राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दीर्घकालीन धोरणात समावेश केल्याने महाराष्ट्राची जागतिक उत्पादन केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एचएस ह्योसुंगचे सीईओ व उपाध्यक्ष एच. एस. चो यांच्यात शाश्वत व सक्षम ऊर्जा प्रणालींकडे होत असलेल्या जागतिक संक्रमणावर तसेच महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत स्वच्छ ऊर्जा, भविष्यसज्ज ऊर्जा पायाभूत सुविधा आणि राज्याच्या दीर्घकालीन औद्योगिक धोरणाशी निगडित विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
या चर्चेत अमरावती येथे उभारण्यात येत असलेल्या पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचाही विशेष उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी मजबूत आणि सर्वसमावेशक वस्त्रोद्योग पार्क परिसंस्था विकसित होत असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील उद्दिष्टे साध्य करताना आणि मोठ्या उत्पादन केंद्रांना ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करताना अशा उच्चस्तरीय संवादांना विशेष महत्त्व असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. अमरावतीतील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कसारख्या प्रकल्पांचा राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दीर्घकालीन धोरणात समावेश केल्याने महाराष्ट्राची जागतिक उत्पादन केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here