शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती

0
46
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे अभ्यागत अध्यापक पदासाठी ८ जुलै रोजी मुलाखत
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे अभ्यागत अध्यापक पदासाठी ८ जुलै रोजी मुलाखत

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे सफाईगार व माळी पदांसाठी कंत्राटी भरती

७ जुलैपर्यंत निविदा अर्ज उपलब्ध

रत्नागिरी, दि. १ : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी संस्थेच्या स्वच्छता व बागकामाच्या कामांसाठी सफाईगार आणि माळी ही पदे कंत्राटी करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक व पात्र कंत्राटदारांकडून मोहोरबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.
इच्छुक कंत्राटदारांनी ३० जून ते ७ जुलै २०२६ या कालावधीत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी शासकीय तंत्रनिकेतन कार्यालयातून कोरे निविदा अर्ज प्राप्त करून घ्यावेत. निविदा अर्जाची किंमत ३०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
भरलेले निविदा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मोहोरबंद लिफाफ्यात ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी यांच्या कार्यालयात सादर करावेत.
प्राप्त झालेल्या सर्व निविदा ९ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता इच्छुक कंत्राटदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत.
कंत्राटी भरती प्रक्रियेबाबतचे सविस्तर नियम व अटी निविदा अर्जासोबत उपलब्ध करून देण्यात आल्या असून, इच्छुकांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तंत्रनिकेतन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here