शासकीय मत्स्यव्यवसाय योजना आणि सहाय्य आता एका टॅपवर
शासकीय मत्स्यव्यवसाय योजना आणि सहाय्य आता एका टॅपवर
NFDP मोबाईल ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन
मुंबई — मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील मच्छीमार, मत्स्यशेती उद्योजक आणि लाभार्थ्यांसाठी शासकीय योजना, अनुदाने आणि विविध सेवांची माहिती आता मोबाईलवर सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी नॅशनल फिशरीज डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP) मोबाईल ॲप डाउनलोड करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या या डिजिटल उपक्रमामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध शासकीय योजना, आर्थिक सहाय्य, अनुदान, अर्ज प्रक्रिया तसेच इतर महत्त्वाची माहिती एका व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे.
लाभार्थ्यांनी NFDP मोबाईल ॲप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती, अर्ज सादर करण्याची सुविधा आणि संबंधित सेवांचा लाभ सहजपणे मिळू शकणार आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे डिजिटलीकरण आणि मच्छीमारांपर्यंत शासकीय सेवांचा वेगाने लाभ पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.