शिक्षक संघाचा दापोलीत गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

0
3
शिक्षक संघाचा दापोलीत गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
शिक्षक संघाचा दापोलीत गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

शिक्षक संघाचा दापोलीत गुणवंत विद्यार्थी व पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका शाखेतर्फे श्री मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा दापोलीच्या वतीने श्री मंगल कार्यालय, दापोली येथे गुणवंत विद्यार्थी व पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला. दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. त्याचबरोबर पदोन्नतीने केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी पदावर नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अजय गराटे हे होते. या कार्यक्रमाला दापोली पंचायत समितीच्या उपसभापती नम्रता तोडणकर, शिक्षण समिती सदस्य प्रभाकर गोलांबडे, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, पंचायत समिती सदस्य निलेश शेठ, राजेंद्र फणसे, ममता शिंदे, तुलसा जाधव, सुचिता महाडिक, सुजाता खळे व श्रीराम इदाते, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष कदम, राष्ट्रीय प्रवक्ते जीवन सुर्वे, जिल्हा सरचिटणीस संतोष रावणंग, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र रणसे, तसेच तालुक्यातील शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, गुणवंत विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक आणि पदोन्नती प्राप्त अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. शिक्षकांवर लादण्यात येणारी अशैक्षणिक कामे रद्द व्हावीत, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती बाबत गांभीर्याने चर्चा झाली. मिशन बंधारे साखळी बाबत नीलेश शेठ व भाऊ ईदाते यांनी आवाहन केले.
नवरात्रोत्सवाचे पर्व सुरू असतानाही विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचा गौरव यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. गुणवंत विद्यार्थी पालक यांनी याचे विशेष कौतुक केले असून पदोन्नतीने यशस्वी झालेल्या नवनियुक्त बांधवांनी दखल घेतल्याने आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त बंधू भगिनी यांनी देखील आधाराच्या पाठिंब्याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दापोली तालुकाध्यक्ष संदीप जालगावकर यांच्यासह महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या संपूर्ण तालुका कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली. उपस्थित सर्व मान्यवर, विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका शाखा दापोलीच्या वतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप जालगावकर यांनी तर सूत्रसंचलन सुरेश साबळे, शुभांगी नावडकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here