शिरोडा-बोरिवली एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; प्रवाशांची एसटी प्रशासनाकडे मागणी!
शिरोडा-बोरिवली एसटी बसफेरी पुन्हा सुरू करा; प्रवाशांची मागणी!
चाकरमान्यांची मुंबईला ये-जा करण्याची गैरसोय; चांगले प्रवासी भारमान असतानाही बसफेरी बंद केल्याने नाराजी
सावंतवाडी (प्रतिनिधी) :
शिरोडा येथून वेंगुर्ला आगारामार्फत शिरोडा-वENGुर्ला मार्गे सुरू असलेली बोरिवली एसटी बसफेरी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या बससेवेमुळे कोकणातील चाकरमान्यांना मुंबईतून गावी येणे आणि मुंबईला जाणे सोयीचे होत होते. या फेरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आणि समाधानकारक प्रवासी भारमान मिळत असतानाही एसटी प्रशासनाने अचानक ही सेवा बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शिरोडा येथून वेंगुर्ला मार्गे बोरिवलीपर्यंत धावणारी ही बसफेरी मुंबई आणि कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची होती. विशेषतः नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना या बससेवेचा मोठा फायदा होत होता. मात्र, कोणत्या कारणामुळे ही बसफेरी बंद करण्यात आली, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या शिरोडा परिसरातून मुंबईच्या दिशेने खासगी बसेसची वाहतूक सुरू आहे. या खासगी बसेसना मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद पाहता शिरोडा-बोरिवली एसटी बसफेरीलाही चांगले प्रवासी भारमान मिळू शकते, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
त्यामुळे एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन शिरोडा-बोरिवली बसफेरी तातडीने पुन्हा सुरू करावी. या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शिरोडा परिसरातील प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.