शिवतेज महिला गोविंदा पथकाची सात थरांची दणदणीत सलामी

0
43
शिवतेज महिला गोविंदा पथकाची सात थरांची दणदणीत सलामी
शिवतेज महिला गोविंदा पथकाची सात थरांची दणदणीत सलामी

शिवतेज महिला गोविंदा पथकाची सात थरांची दणदणीत सलामी

मनसेच्या दहीहंडी उत्सवात कोपरी-ठाण्याच्या महिला गोविंदांचा थरार

ठाणे : जिद्द, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर शिवतेज महिला गोविंदा पथकाने मनसेच्या दहीहंडी उत्सवात तब्बल सात थरांची यशस्वी सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली. ठाण्यातील भगवती मैदानावर रंगलेल्या दहीहंडी उत्सवात शिवतेज महिला गोविंदा पथकाच्या दमदार कामगिरीने वातावरणात उत्साह संचारला.
कोपरी-ठाणे येथील या महिला गोविंदा पथकाची स्थापना २००५ मध्ये झाली असून, यंदा पथकाने आपल्या सातत्यपूर्ण अभिमानाच्या २१ वर्षांचा टप्पा गाठला आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून पथकाने दहीहंडीच्या माध्यमातून महिलांच्या सामर्थ्याचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवले आहे.
पथकाचे प्रशिक्षक श्री. प्रवीण दळवी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा भगिनींनी सराव, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर सात थरांची ही यशस्वी सलामी दिली.
“नको कोणाशी फक्त जिद्द असावी, स्वतःला सिद्ध करण्याची!” हे पथकाचे घोषवाक्य असून, त्याच जिद्दीची आणि आत्मविश्वासाची प्रचिती सात थरांच्या या यशस्वी सलामीतून आली. महिला गोविंदा पथकाच्या या उल्लेखनीय कामगिरीचे उपस्थितांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here