शिवाजीनगर स्टेडियम येथील गाळ्यांच्या छताला आग

0
104
शिवाजीनगर स्टेडियम येथील गाळ्यांच्या छताला आग
शिवाजीनगर स्टेडियम येथील गाळ्यांच्या छताला आग

शिवाजीनगर स्टेडियम येथील गाळ्यांच्या छताला आग

रत्नागिरी

रत्नागिरी शहरात गेले दोन आग लागण्याच्या घटना घडत आहेत आज सकाळी मारुती मंदिर शिवाजी स्टेडियमजवळील दुकानांचे गाळे आणि त्याखालील गाळ्यांच्या छतावर ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. ही आग प्रथम दुकानाच्या गाळ्यांच्या छतावर लागली. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात त्वरित गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेची माहिती मिळताच, परिसरातील जागरूक रहिवाशांनी आग विझवण्याचे काम सुरू केले. मिळेल त्या साधनांनी, प्रामुख्याने पाण्याचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचा त्यांनी शर्थीचा प्रयत्न केला. त्याचबरोबर, आग मोठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here