शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद

0
9
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी "अन्नदात्यासाठी अन्नत्याग" आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद

पंढरपूर:
पंढरपूर येथे शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असताना आमदार रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. आंदोलनादरम्यान प्रकृती खालावल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची आई, पत्नी आणि मुले आंदोलनस्थळी दाखल झाली होती.

या भेटीदरम्यान भावनिक वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे समाजहितासाठीची लढाई अधिक बळकट होत असल्याची भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here