शेरेवाडीतील दुहेरी हत्याकांड; सुनेत्रा पवारांकडून कुटुंबीयांची सांत्वनपर भेट, तपासासाठी १० पथके

0
18

बारामती :
बारामती मतदारसंघातील शेरेवाडी येथे तीन दिवसांपूर्वी दिवंगत इंदुबाई मारुती लडकत आणि दिवंगत कृष्णाबाई कुंडलिक लडकत या दोन महिलांची हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मृत महिलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत धीर दिला.

या घटनेचा लवकरात लवकर तपास करून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासनाला तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची १० पथके नियुक्त करण्यात आली असून, विविध दिशांनी तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली. तपास वेगाने सुरू असल्याने या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कुटुंबीयांच्या भावना समजून घेत त्यांना या कठीण प्रसंगी धीर देत, घटनेचा तपास अधिक वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here