शैक्षणिक गुणवत्तावाढीला मिळणार नवी दिशा; शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा समितीत समावेश!

0
12
शैक्षणिक गुणवत्तावाढीला मिळणार नवी दिशा
शैक्षणिक गुणवत्तावाढीला मिळणार नवी दिशा

शैक्षणिक गुणवत्तावाढीला मिळणार नवी दिशा; शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांचा समितीत समावेश!

दापोली पंचायत समिती शिक्षण समन्वय समितीची अधिकृत स्थापना; आमदार योगेशदादा कदम अध्यक्ष, उन्मेष राजे उपाध्यक्ष

दापोली | प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
तालुक्यातील प्राथमिक शिक्षणाचे सक्षमीकरण, शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी पंचायत समिती दापोली शिक्षण समन्वय समितीची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार गठित करण्यात आलेल्या या समितीत लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्था प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
तालुकास्तरावर प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी पंचायत समिती स्तरावर शिक्षण समन्वय समिती स्थापन करण्याच्या शासनाच्या निर्देशानुसार दापोली पंचायत समितीची ही समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ना. श्री. योगेशदादा रामदास कदम, तर उपाध्यक्षपदी पंचायत समिती दापोलीचे सभापती मा. श्री. उन्मेष रामचंद्र राजे यांची निवड करण्यात आली आहे.
समितीमध्ये सेवाभावी शिक्षण संस्था प्रतिनिधी म्हणून श्री. शांताराम धोंडू पवार व श्री. अनंत सखाराम करबले यांचा समावेश आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी म्हणून श्री. रियाज झकेरिया काझी, श्री. समीर सिताराम कांबळे व श्री. अमोल अशोक येलवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. दिनेश काशिनाथ रूके, श्रीमती आशा दगडू जाधव, श्री. सुमित सुरेश जाधव, श्री. मनोहर शंकर जंगम व श्री. राजेश रमेश झगडे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य प्रतिनिधी म्हणून श्री. महेश सिताराम शिंदे व श्री. चेतन राजाराम राणे, वैद्यकीय अधिकारी म्हणून मा. श्री. डॉ. पवन बबुवान सावंत, तसेच तहसीलदार मा. श्रीमती अर्चना विनोद बोंबे-घोलप यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय प्रकल्प अधिकारी श्रीमती अंकिता अरुण महाडीक, राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संजय मनोहर मेहता, गट शिक्षणाधिकारी मा. श्री. रामचंद्र विठ्ठल सांगडे यांचा समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
गट विकास अधिकारी मा. श्री. गणेश कोंडीराम मंडलिक यांची समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, शाळांचे सक्षमीकरण करणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजना करणे, पालक-शिक्षकांचा सहभाग वाढविणे तसेच शिक्षण विभागाशी संबंधित विविध प्रश्नांवर समन्वय साधणे, या दृष्टीने समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकप्रतिनिधी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, पालक प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीमुळे दापोली तालुक्यातील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी समितीच्या माध्यमातून ठोस आणि परिणामकारक उपक्रम राबविले जाण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here