शोभा गायधने यांना राज्याचा सेंद्रिय शेती पुरस्कार

0
339
शोभा गायधने यांना राज्याचा सेंद्रिय शेती पुरस्कार
शोभा गायधने यांना राज्याचा सेंद्रिय शेती पुरस्कार

शोभा गायधने यांना राज्याचा सेंद्रिय शेती पुरस्कार

वर्धा : अलिकडच्या काळात केमिकलमुक्त व नैसर्गिक उत्पादनांना ग्राहकांची वाढती पसंती मिळत असताना, विदर्भातील वायगाव हळद्या (जि. वर्धा) येथील ६५ वर्षीय कर्तृत्ववान शेतकरी आजी शोभा झिबल गायधने यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आदर्श निर्माण केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या नैसर्गिक पद्धतीने शेती करत असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेती पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

पुणे येथील भीमथडी जत्रेत आयोजित प्रदर्शनात ‘गायधने नैसर्गिक शेती’ या नावाने उभारलेल्या त्यांच्या नैसर्गिक हळदीच्या स्टॉलला भेट देत बाबांसोबत (राजेंद्रदादा पवार) त्यांच्या कामाविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

६५ व्या वर्षीही शेतीत नवनवीन प्रयोग करत नैसर्गिक उत्पादनांचा आग्रह धरणारे शोभा गायधने यांचे कार्य अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा संदेश त्या प्रभावीपणे देत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here