सर्वोच्च न्यायालयात पाच जणांच्या नियुक्तीची शिफारस; कॉलेजियमचा महत्त्वपूर्ण निर्णय
सर्वोच्च न्यायालयात पाच जणांच्या नियुक्तीची शिफारस; कॉलेजियमचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने २२ आणि २७ मे रोजी झालेल्या बैठकीत पाच जणांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती करण्याची शिफारस केली आहे.
कॉलेजियमने शिफारस केलेल्या नावांमध्ये न्यायमूर्ती शील नागू (मुख्य न्यायाधीश, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय), न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर (मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय), न्यायमूर्ती संजीव सचदेवा (मुख्य न्यायाधीश, मध्य प्रदेश उच्च न्यायालय), न्यायमूर्ती अरुण पल्ली (मुख्य न्यायाधीश, जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय) तसेच वरिष्ठ अधिवक्ता व्ही. मोहना यांचा समावेश आहे.
या शिफारशींनंतर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधितांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती होणार आहे. न्यायव्यवस्थेतील या महत्त्वपूर्ण घडामोडीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.