साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

0
10
साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिका हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सदस्यांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना

सदस्यांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना

मुंबई :
‘साई प्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित’ या संस्थेतील प्रलंबित सदनिका हस्तांतरण प्रकरणाबाबत महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सदनिका हस्तांतरण प्रक्रियेतील अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संस्थेतील सदस्यांना त्यांच्या सदनिकांचा मालकी हक्क लवकरात लवकर मिळावा, तसेच हस्तांतरण प्रक्रियेत येणारे तांत्रिक अडथळे दूर व्हावेत, यासाठी बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. संबंधित प्रकरणाचा आढावा घेत सदस्यांना दिलासा मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत योग्य सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस सहआयुक्त संजोग कबरे, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, माजी नगरसेवक महेश पारकर आणि संस्थेचे सरचिटणीस अशोक साळवी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here