सायबर गुन्हेगारीविरुद्ध रायगड पोलिसांची मोठी कारवाई; ₹35.30 कोटींच्या व्यवहारांचा उलगडा

0
17

रायगड :
सायबर फसवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या २३ म्युल अकाउंट धारकांविरुद्ध रायगड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुमारे ₹35.30 कोटींच्या आर्थिक व्यवहारांचा उलगडा झाला असून, सायबर गुन्हेगारीविरोधातील ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.
सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणुकीतून मिळालेली रक्कम विविध बँक खात्यांमार्फत वळविण्यासाठी म्युल अकाउंट्सचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित खात्यांचा सखोल तपास करत कारवाईचा बडगा उगारला आहे.
रायगड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपले बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, आधार कार्ड किंवा इतर वैयक्तिक कागदपत्रे वापरण्यास देऊ नयेत. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये नकळत सहभाग होण्याची शक्यता असते.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन करताना पोलिसांनी संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here