सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने उभा बाजार येथील जीवन रक्षा कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांचे तसेच लालबहादूर शास्त्री यांच्या साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. गांधीजींचे अहिंसेचे तत्त्व आणि शास्त्रीजींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षपदी नगरसेवक तौकीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर आणि जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय मालवणकर, प्रदेश प्रतिनिधी ॲड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र मापसेकर, माजी जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, विनायक ओटवणेकर, अमिदी मेस्त्री, सुमेधा सावंत, आनंद आयरे, कौस्तुभ पेडणेकर, सुधीर मल्हार, बाळा नमशी, प्रदीप चौगुले, आफताब हेरेकर, सुभाष नाईक, नगरसेवक तौकीर शेख, अन्वर खान, पीटर फर्नांडिस, विनायक सावंत यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.