सावंतवाडी रोड स्थानकावर २६ जुलैपासून सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा

0
17
सावंतवाडी रोड स्थानकावर २६ जुलैपासून सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा
सावंतवाडी रोड स्थानकावर २६ जुलैपासून सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा

सावंतवाडी रोड स्थानकावर २६ जुलैपासून सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा

बातमी :

सावंतवाडी :
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, २६ जुलै २०२६ पासून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर सहा महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई, मंगळुरू, तिरुवनंतपुरम आणि हजरत निजामुद्दीन या मार्गांवरील प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

प्रायोगिक थांबा मिळालेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • १२१३३ मुंबई CSMT – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस (दररोज) – सावंतवाडी रोड आगमन ०७:०२, प्रस्थान ०७:०४ (२६ जुलै २०२६ पासून)
  • १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई CSMT एक्सप्रेस (दररोज) – आगमन २३:३०, प्रस्थान २३:३२ (२७ जुलै २०२६ पासून)
  • १२४३२ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस (त्रैसाप्ताहिक) – आगमन ०६:१८, प्रस्थान ०६:२० (२६ जुलै २०२६ पासून)
  • १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (त्रैसाप्ताहिक) – आगमन ०९:४४, प्रस्थान ०९:४६ (२८ जुलै २०२६ पासून)
  • १२२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक) – आगमन ०२:०२, प्रस्थान ०२:०४ (२७ जुलै २०२६ पासून)
  • १२२०२ तिरुवनंतपुरम नॉर्थ – लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस (द्विसाप्ताहिक) – आगमन ०३:२८, प्रस्थान ०३:३० (३० जुलै २०२६ पासून)
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेची नोंद घेण्याचे आवाहन केले असून, गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक आणि इतर माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी पोर्टलवर उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here