सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत

0
45

पुणे l प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल पुणेकरांच्या सेवेत दाखल झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

या उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार असून शहरातील वाहतुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. शहराला वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियोजन करण्यात येत असून विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून पुण्याच्या विकासाला गती देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here