सिंधुदुर्गातील CRZ व NCLT प्रकरणावर मंत्रालयात बैठक; मंत्री नितेश राणे यांची माहिती

0
40

मुंबई :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरील CRZ (Coastal Regulation Zone) संदर्भातील प्रश्न तसेच NCLT मध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत मंत्रालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागाशी संबंधित CRZ विषयक प्रश्नांवर तसेच NCLT मधील प्रलंबित प्रकरणावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक बाबींवरही बैठकीत विचारविनिमय झाला.
यावेळी मालवण शहर व परिसरातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवरील विकासकामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.
बैठकीस स्थानिक आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मालवण नगरपरिषदेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर, माजी नगरसेवक जॉन नऱ्होना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागातील CRZ विषयक अडचणी आणि मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here