सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे यांच्या गाडीला पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात

0
71

भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांच्या गाडीला पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला आहे.हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उर्से टोलनाका येथे घडला. सुदैवाने या अपघाता कोणासही ईजा झालेली नाही. नितेश राणेंचे पत्नी मुलं आणि काही नातेवाईक या गाडीमध्ये होते.
नितेश राणे यांच्या पत्नी ऋतुजा राणे सोमवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होत्या. उर्से टोलनाका येथे गाडी टोल भरण्यासाठी रांगेत थांबलेली होती. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने राणेंच्या गाडीला धडक दिली. यामुळे यामध्ये कोणालाही ईजा झालेली नाही. अपघात झाला तेव्हा नितेश राणे हे या गाडीमध्ये नव्हते. यामध्ये त्यांच्या पत्नी, मुलं आणि नातेवाईक असल्याची माहिती आहे. गाडीला ट्रकने मागून धडक दिल्यामळे गाडीचा इंडिकेटर फुटला आणि थोडा डॅश गेला आहे. किरकोळ अपघात असल्याने सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. .ट्रकची धडक ही ब्रेक फेल झाल्यामुळे झाली का याचा शोध पोलिस घेत आहेत.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here