वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्ममय मंडळाच्यावतीने कथाकथन व कथालेखन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्याचे ठरवले आहे. यामध्ये कथेचे मानवी जीवनातील स्थान, कथाकथनाचे महत्त्व व उपयोग, कथाकथनाची दशसूत्री इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन होईल.तसेच कथालेखनामध्ये लघुकथा म्हणजे काय? कथा व कादंबरी यातील मूलभूत फरक, कथेची भाषा, कथेचा घाट, कथा लिहिण्यासाठी आवश्यक गोष्टी इत्यादी मुद्यांवर कादंबरीकार वृंदा कांबळी या मार्गदर्शन करणार आहेत.
जे या मार्गदर्शनासाठी इच्छुक आहेत त्यांनी ९४२१२६२०३० या नंबरवर संपर्क साधून नावनोंदणी करावी. अपेक्षित संख्या भरल्यावर तारीख स्थळ व वेळ इत्यादी तपशील कळविला जाईल. प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांनी संपर्क साधावा.


