सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ ‘सागरिका’ बोटीचा दुर्दैवी अपघात; दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ ‘सागरिका’ बोटीचा दुर्दैवी अपघात; दोघांचा मृत्यू
मालवण :
सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ‘सागरिका’ बोटीचा दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत नौका मालक तथा भाजपा मालवण तालुका उपाध्यक्ष सन्मेश परब आणि त्यांचे खलाशी अक्षय हनुमंत राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेने मालवण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ही दुर्घटना अत्यंत दुःखद असल्याचे त्यांनी सांगितले.
सन्मेश परब आणि अक्षय हनुमंत राणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले. या कठीण प्रसंगातून सावरण्याचे आणि दुःख सहन करण्याचे बळ त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.