सिंधुदुर्ग : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात रविवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप

0
47
पाच दिवसांच्या गणपतींना निरोप

वेंगुर्ला प्रतिनिधी- गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात रविवारी पाच दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला.

 गेले चार दिवस घरोघरी भक्तिमय वातावरणात गणपतीचे पूजन सुरु होते. दुपारी, सायंकाळी आणि रात्रौ आरतीचे सूर निनादत होते. टाळ, मृदुंग आणि हार्मोनिअमच्या साथीने तर पहाटेपर्यंत भजनेही सुरु होती. त्यातच ब-याच ठिकाणी श्रीसत्यनारायण महापूजाही घालण्यात आल्या. एकंदर घराघरात भक्तिमय वातावरण असताना रविवार पाच दिवसांच्या गणपतीचे विजर्सन करण्यात आले. पाच दिवसांच्या कालावधीत पावसाने बरीच उसंत घेतल्याने भजन आणि विसर्जनावेळी पावसामुळे उत्सवात अडथळा आला नाही. रविवारी सायंकाळपासून ते रात्रौ साडेबारापर्यंत पाणवठ्याच्या ठिकाणी गणपतींचे विसर्जन सुरु होते.

फोटोओळी – गणपती विसर्जनावेळी बहुसंख्य गणेश भक्तांनी एकत्रित आरती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here