प्रतिनिधी-संजय भाईप (सावंतवाडी )
सावंतवाडी :केवळ विजबिलाच्या वसुली साठी विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी देणारी विजवितरण कंपनीचे सेवादेण्यात तिनतेरा वाजले आहेत.दररोज विज पुरवठा खंडीत होत असल्याने विज ग्राहक त्रस्त झाले आहेत. वारंवार प्रत्येक गावातुन याबाबत अधीकाऱ्याना जाब विचारूनही अधीकारी कोणतेही पाऊल ऊचलत नाहीत. या नीरढावलेल्या अधीकाऱ्याना फक्त वसुली शिवाय आणखी काहीच काम राहीलेले नाही.
पावसाळ्यापूर्वी साफसफाई करावयाची असताना यावर्षी काहीच काम न केल्याने वारवार विजपूरवठा खंडीत होत आहे.कोकणातला सर्वात मोठा ऊत्सव गणेश चतूर्थी काही दिवसांवर आली असताना वाजवितरण कंपनीकडुन काहीच हालचाल करत नसल्याने कास ग्रामस्थांनी विद्युत वाहीन्यानवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडुन केली सफाई.विजवितरण कंपनीच्या अधीकाऱ्याच्या कारभाराचा विजग्राहकांमधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.


