सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज शिवाजी परब यांचे आकस्मिक निधन

0
7

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ सामाजिक-राजकीय कार्यकर्त्या सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सरोज परब या १९९० पासून राणे साहेबांसोबत निष्ठेने कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सहकारी होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले योगदान महत्त्वपूर्ण होते.

त्यांच्या निधनाबद्दल आमदार नीलेश राणे यांनी दुःख व्यक्त केले. “सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले. त्यांचे योगदान आणि आठवणी सदैव स्मरणात राहतील,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या दुःखद प्रसंगी परब कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत आमदार नीलेश राणे यांनी ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशी प्रार्थना केली.

सरोजताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here