सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांच्या मातोश्री सीताबाई तर्फे यांचे निधन
कणकवलीतील निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास
कणकवली / प्रतिनिधी :
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन रामचंद्र तर्फे यांच्या मातोश्री श्रीमती. सीताबाई रामचंद्र तर्फे (वय वर्ष – (८४) यांचे आज मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५:०० वाजता येथील राहत्या निवासस्थानी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त होत आहे.
श्रीमती सीताबाई तर्फे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा (श्री. वामन तर्फे), जावई, सुनेसह नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या श्री. वामन तर्फे यांच्या अत्यंत लाडक्या आणि मार्गदर्शक मातोश्री होत्या.
अंतिम दर्शन व अंत्यसंस्कार:
श्रीमती सीताबाई तर्फे यांच्या पार्थिवावर आज, मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजता त्यांच्या मूळगाव जांभवडे (भूतवड बामनवाडी) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार (अग्नीसंस्कार) करण्यात येणार आहेत. त्यांच्या या दुःखद प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तर्फे कुटुंबाच्या या दुःखद प्रसंगी तीव्र शोक संवेदना व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.