सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला व बालकल्याणासाठी ‘नवदुर्गा’ जनजागृती उपक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला व बालकल्याणासाठी ‘नवदुर्गा’ जनजागृती उपक्रम
नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ रंगांच्या संकल्पनेतून शासकीय योजना, कायदे आणि मदत यंत्रणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणार
सिंधुदुर्ग :
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून महिला व बालकांचे संरक्षण, सक्षमीकरण आणि कल्याण यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे ‘नवदुर्गा’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत नऊ वेगवेगळ्या रंगांच्या संकल्पनेतून महिला आणि बालकल्याणाशी संबंधित महत्त्वाचे कायदे, शासकीय योजना तसेच उपलब्ध मदत यंत्रणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला व बालकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना उपलब्ध असलेल्या शासकीय सुविधांची माहिती देणे आणि गरजूंना योग्य मदत यंत्रणांपर्यंत पोहोचण्यास मार्गदर्शन करणे हा उद्देश आहे.
महिला व बालकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.