सिंधुदुर्ग : ज्येष्ठ निवृत्त शिक्षक लवू देसाई यांचा सत्कार

0
73

वेंगुर्ला प्रतिनिधी- अणसूर-पाल येथील हायस्कुलमध्ये सुमारे ३९ वर्षे शिक्षक म्हणून सेवा देवून निवृत्त झालेले आज वय वर्षे ८८ असतानाही विद्यार्थ्यांना व मुलांना मार्गदर्शन करणारे व वाचन हाच शिक्षणातील विकासाचा प्रमुख घटक मानणारे आसोली गावचे रहिवासी लवू देसाई यांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून वेतोरे शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक एम.के.गावडे यांनी देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन गुरूवर्य या नात्याने शालश्रीफळपुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते एम.के.गावडे हे दरवर्षी सर्वात ज्येष्ठ अशा शिक्षकाचा शिक्षकदिनाचे औचित्य साधून सत्कार करतात. त्यानुसार आसोली येथील जेष्ठ समाजसेवक स्व. अंकुश देसाई यांचे सख्खे बंधु लवू लक्ष्मण देसाई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सुरंगी महिला औद्योगिक फळप्रक्रिया संस्थेच्या चेअरमन सुजाता देसाई, निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर जाधव, देसाई यांचे मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी प्रथमेश देसाई, साक्षी गावडे, श्रावणी गावडे, भगवान गावडे आदी उपस्थित होते.

      यावेळी ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक लवू देसाई हे विविध पुस्तकांचा संग्रह करीत आहे. त्यांचे तसेच वृत्तपत्रांचे वाचन नेहमी करत आहे. त्यातून ज्ञान वाढते. आपल्या घरात कोकण रेल्वेचे शिल्पकार स्व.प्रा.मधु दंडवतेजॉर्ज फर्नाडिस या फार मोठ्या व्यक्तींचा पदस्पर्श झाला असल्याची माहिती लवू देसाई यांनी दिली.

फोटोओळी – वयाच्या ८८व्या वर्षीही मुलांना मार्गदर्शन करणा-या लवू देसाई या निवृत्त शिक्षकांचा एम.के.गावडे यांनी सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here