वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला-गाडीअड्डा येथे तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळाच्यावतीने प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीचे शुक्रवारी रात्रौ मांडवी खाडी येथे विसर्जन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही गाडीअड्डा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त भजन, पूजन असे कार्यक्रम पार पडले. या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी अनंत चतुदर्शी दिवशी करण्यात आले. गाडीअड्डा तिठा, बाजारपेठ, दाभोली नाका, जुना स्टॅड मार्गे मांडवी खाडी अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत बहुसंख्य गणेशभक्त सहभागी झाले होते. रात्रौ उशिरा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
फोटोओळी – तांबळेश्वर-भगवती मित्रमंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.


