सिंधुदुर्ग – नवरात्र उत्सवात पोलिसांना जादा अधिकार

0
84
नवरात्र उत्सवात पोलिसांना जादा अधिकार

सिंधुदुर्ग- आगामी नवरात्रोत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान केले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१चे कलम ३६ प्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी हे अधिकार दिले. २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत हे अधिकार राहणार आहेत.
जिल्ह्यात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित व अप्रिय घटना घडून कायदा व सुव्यवस्थेस बाधा येऊ नये यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन केले आहे. या अधिकारानुसार रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा रॅलीतील, जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे, त्यांची वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी आदेश देणारी रॅली कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळेत काढाव्यात किंवा काढू नयेत, असे मार्ग किंवा वेळा विहित करणे. सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here