प्रतिनिधी:अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ – अणाव ( घाटचेपेड वाडी ) येथील रहिवासी सुहासिनी वामन दळवी वय ७५ वर्षे यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी दुपारी २-३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना दोन मुली, एक जावई, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार गुरुप्रसाद दळवी तसेच पणदूर येथील रिक्षाचालक बाळू दळवी यांच्या त्या आई होत.


