सिंधुदुर्ग : पाल्यासाठी पालकांनी सादर केले कलागुण

0
34

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालकदिन साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन रोटरीचे सेक्रेटरी पंकज शिरसाट यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात पालकांनी आपल्या पाल्यासाठी विविध कलागुण सादर केले. यात दिव्या मांजरेकर, सपना धुरी, समिता गोसावी, मनिष सातार्डेकर, सावी पाटील, स्वराली कोटीमकर, मानसी सातार्डेकर, कार्तिकी पवार, दिगंबर मोबारकर, वैभवी तुळसकर यांचा समावेश होता. यावेळी घेतलेल्या ‘सुपर पॅरेन्टस‘ या स्पर्धेचे सर्वांचे लक्ष वेधले. दिगंबर मोबारकर यांनी ‘सुपर पॅरेन्टस‘ चा किताब मिळविला. या स्पर्धेचे परीक्षण गटसाधन केंद्र वेंगुर्ल्याच्या शिवानी आळवे व तेजस्विनी तांडेल यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालकांच्यावतीने प्रगती चव्हाण यांनी केले.

यावेळी प्रा.डॉ. आनंद बांदेकर, प्रा. डॉ. वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, अनमोल गिरप, मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. ममता वैद्य यांनी तर आभार कु. निकिता गावडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here