सिंधुदुर्ग : भविष्यात शिवसेनेतर्फे विद्यार्थ्यांना मदत

0
21
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी-

विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. कठोर परिश्रम घेत व संकटांवर मात करीत यशस्वी व्हावे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी वेंगुर्ला तालुका शिवसेनेने केलेला विद्यार्थी गुणगौरव हा निश्चितच स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही शिवसेनेमार्फत विद्यार्थ्यांना लागणारी मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी वेंगुर्ला येथे केले.

वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला तालुक्यातील दहावी – बारावीतील ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा साई दरबार हॉल येथे माजी आमदार शंकर कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संफप्रमुख शैलेश परब, माजी सरपंच प्रकाश गडेकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, बाळा दळवी, तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, महिला शहर संघटिका मंजुषा आरोलकर, माजी नगरसेवक तुषार सापळे, उपतालुकाप्रमुख उमेश नाईक, शहर समन्वयक विवेकानंद आरोलकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वायंगणी सरपंच सुमन कामत, निलेश चमणकर आदींसह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत परब व आभार आनंद दाभोलकर यांनी मानले.

फोटोओळी – तालुका शिवसेनेतर्फे संजय पडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here