वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला-गिरपवाडा येथील रहिवासी व दाभोलीनाका येथील ‘गांधी मिठाई‘ दुकानाच्या मालक श्रीमती वृंदावनी तुळशीदास गिरप (८३) यांचे ९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात २ मुलगे, २ मुली, सुना, जावई, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे.
गांधी मिठाईचे मालक सदानंद गिरप यांच्या त्या आई तर सेवानिवृत्त पोलीस अंमलदार नागेश गिरप यांच्या त्या काकी होत.
फोटो-वृंदावनी गिरप


