सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ मे रोजी हिस्टोपॅथोलॉजी लॅब व C-Arm मशीनचे लोकार्पण

0
6

सिंधुदुर्ग : Government Medical College Sindhudurg येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा व C-Arm मशीनचे लोकार्पण शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता पार पडणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री Nitesh Rane यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण मंत्री Hasan Mushrif, खासदार Narayan Rane, जिल्हा परिषद अध्यक्ष Pramod Kamat तसेच आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

याशिवाय जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर आणि पोलीस अधीक्षक Mohan Dahikar यांची उपस्थिती अपेक्षित आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन अधिष्ठाता Dr Anant Davange यांनी केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या अत्याधुनिक सुविधांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना अधिक अचूक निदान व उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here