वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
‘माझा वेंगुर्ला‘ व लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव रानभाज्यांचा‘ अंतर्गत प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धेत सानिका नाईक (वेतोरे) यांनी शतावरीपासून बनविलेले शिरवळे यांस प्रथम क्रमांक, सुमित्रा सावंत (वेतोरे) हिने बनविलेल्या कोरफडाच्या करंज्या व गोकर्णाचा चहा यांस द्वितीय क्रमांक तर प्रियांका गावडे (वेंगुर्ला) हिने बनविलेली भरलेली फागली यांस तृतीय क्रमांक मिळाला. तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक संध्या करंगुटकर (वेंगुर्ला) हिने बनविलेल्या सुरणाच्या हलवा या पदार्थास व द्वितीय क्रमांक श्रेया रेडकर (वेंगुर्ला) हिने बनविलेल्या फातरीची भाजी व चाईच्या भाजीचे मोदक या पदार्थास मिळाला.
स्वामिनी मंडप हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे रिझनल मॅनेजर आनंद सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘माझा वेंगुर्ला‘ चे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, मंगल परूळेकर, मोहन होडावडेकर, सुनिल नांदोस्कर, प्रशांत आपटे, जयप्रकाश चमणकर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या मार्केटींग मॅनेजर साक्षी मयेकर, वेंगुर्ला शाखाधिकारी पुरूषोत्तम राऊळ, कुडाळ शाखाधिकारी ऋषिकेश सामंत यांचा समावेश होता. स्पर्धेतील विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे गृहपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. प्रशांत आपटे यांनी सूत्रसंचालन तर निलेश चेंदवणकर यांनी आभार मानले.
फोटोओळी – रानभाजी पाककला स्पर्धेतील विजेते व सहभागी स्पर्धकांना भेटवस्त्ू देऊन गौरविण्यात आले.


