सिडकोची ‘माझा फर्स्ट चॉईस’ महागृहनिर्माण योजना

0
159
सिडकोची ‘माझा फर्स्ट चॉईस’ महागृहनिर्माण योजना; नवी मुंबईत ९,२४९ नव्या घरांची संधी
सिडकोची ‘माझा फर्स्ट चॉईस’ महागृहनिर्माण योजना; नवी मुंबईत ९,२४९ नव्या घरांची संधी

सिडकोची ‘माझा फर्स्ट चॉईस’ महागृहनिर्माण योजना; नवी मुंबईत ९,२४९ नव्या घरांची संधी

नवी मुंबई l

सिडकोने नवी मुंबईत नागरिकांसाठी ‘माझा फर्स्ट चॉईस’ ही नवीन महागृहनिर्माण योजना जाहीर केली असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या योजनेत वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली परिसरात एकूण ९,२४९ नवीन घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच यापूर्वी घरांची पसंती निवडलेल्या ९,८८३ अर्जदारांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

EWS आणि LIG घटकांसाठी १ व २ BHK घरे उपलब्ध असून, सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्याचा सिडकोचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे.

नोंदणीसाठी इच्छुकांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here