सेवा संकल्प अभियानांतर्गत पेण येथे महिला जनजागृती कार्यक्रम
सेवा संकल्प अभियानांतर्गत पेण येथे महिला जनजागृती कार्यक्रम
पेण : ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत मसद बेडी, ता. पेण येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने महिला जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून महिला व बालकांच्या हक्कांसह त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायदे व योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बाल हक्क, चाईल्ड हेल्पलाईन 1098, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजुरी प्रतिबंधक कायदा, POCSO Act, POSH Act तसेच महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. महिला व बालकांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहण्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या अन्याय अथवा अत्याचाराच्या घटना घडल्यास उपलब्ध यंत्रणांशी संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका संरक्षण अधिकारी श्रीमती चंचल विजेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सहाय्यक संरक्षण अधिकारी श्रीमती राखी चव्हाण तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमातून महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.