सेवा संकल्प अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती कार्यक्रम

0
12
सेवा संकल्प अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती कार्यक्रम
सेवा संकल्प अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती कार्यक्रम

सेवा संकल्प अभियानांतर्गत पेणमध्ये जनजागृती कार्यक्रम

बालहक्क, बालसंरक्षण आणि महिला सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; ४३५ विद्यार्थी व १५ शिक्षिकांचा सहभाग

पेण, प्रतिनिधी :
रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ के. ई. एस. लिटल स्कूल, पेण येथे गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हा प्रकल्प समन्वयक श्री. प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क, बालसंरक्षण, बालमजुरी, बालविवाह, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ तसेच बालसंगोपन योजना याविषयी मार्गदर्शन केले. बालकांचे हक्क जपणे, त्यांच्यावरील अन्याय रोखणे आणि संकटाच्या परिस्थितीत मदत कशी मिळवावी, याबाबत त्यांनी माहिती दिली.
तसेच श्रीमती चंचल विजेकर यांनी घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, २००५ आणि महिलांवरील अत्याचार या विषयांवर मार्गदर्शन केले. महिला सुरक्षा, कायदेशीर संरक्षण आणि सामाजिक जागरूकतेचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत ‘माझ्या संकल्पनेतील भारत – विकसित भारत २०४७’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पना आणि कलागुणांचे प्रदर्शन केले.
या जनजागृती कार्यक्रमात एकूण ४३५ विद्यार्थी आणि १५ शिक्षिकांनी सहभाग नोंदवला. बालहक्क, महिला सुरक्षा आणि विकसित भारताच्या संकल्पनेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here