सेवा संकल्प अभियानातून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा

0
19
सेवा संकल्प अभियानातून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा
सेवा संकल्प अभियानातून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा

सेवा संकल्प अभियानातून असोंड आश्रमशाळेला दोन महिन्यांचा किराणा

खेड तालुका सहकार क्षेत्राचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी मदतीचा हात

खेड :
महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, खेड आणि खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघ (फेडरेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा भटक्या व विमुक्त जाती माध्यमिक आश्रमशाळा, असोंड येथे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्यांचे किराणा सामान शाळेकडे सुपूर्द करण्यात आले.
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वाढ आणि सर्वांगीण विकासासाठी सकस पोषण महत्त्वाचे असल्याचे लक्षात घेऊन सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ही मदत करण्यात आली. समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी खेड तालुक्यातील सहकार क्षेत्राला आपला खारीचा वाटा उचलता आल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, खेड) योगिता मुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी खेड तालुका नागरी सहकारी पतसंस्था संघाचे अध्यक्ष वसंत पिंपळकर, कार्याध्यक्ष अभिनय महाजन, उपाध्यक्ष संदिप मोदी, सचिव रमाकांत पाटील, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पाटील, सदस्य श्रावणी आंबेडे आणि स्नेहा हळदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व आभार आश्रमशाळेचे अधीक्षक संतोष हांडे यांनी मानले. यावेळी आश्रमशाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार विभागाच्या या सामाजिक व संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here