‘सॉफ्ट टॉय उद्यमी’ होण्याची सुवर्णसंधी; रायगडमध्ये मोफत प्रशिक्षण

0
18
‘सॉफ्ट टॉय उद्यमी’ होण्याची सुवर्णसंधी; रायगडमध्ये मोफत प्रशिक्षण
‘सॉफ्ट टॉय उद्यमी’ होण्याची सुवर्णसंधी; रायगडमध्ये मोफत प्रशिक्षण

‘सॉफ्ट टॉय उद्यमी’ होण्याची सुवर्णसंधी; रायगडमध्ये मोफत प्रशिक्षण

RSETI रायगड आणि बँक ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने १४ दिवसांचे प्रशिक्षण

अलिबाग :
सॉफ्ट टॉय निर्मितीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी बँक ऑफ इंडिया पुरस्कृत RSETI रायगडच्या वतीने मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी ही प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी १४ दिवसांचा असून, दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण पंतनगर, अलिबाग, जिल्हा रायगड येथे आहे.
प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांचे वय १८ ते ५० वर्षे असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणार्थींना मोफत निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मान्यतेनुसार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे सॉफ्ट टॉय निर्मितीचे कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नावनोंदणीसाठी:
Google Form वर नावनोंदणी करा

अधिक माहितीसाठी संपर्क :
स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड (RSETI)
१ ला मजला, पुष्कराज बंगला, पंतनगर, अलिबाग, जि. रायगड.
मोबाईल : 7030284884 / 7558606765 / 9607502375 / 9145144166

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here