सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत स्थानबद्धता रद्द

0
61

केंद्र सरकारने लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (NSA) अंतर्गत करण्यात आलेली स्थानबद्धता रद्द केली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

गेल्या ऑक्टोबरपासून या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी त्यांच्या स्थानबद्धतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत स्थानबद्धतेचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात १७ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार असून केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सुनावणीदरम्यान या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here