स्क्वाड्रन लीडर सान्या ठरल्या पहिल्या महिला ‘कॅटेगरी-ए QFI’
हवाई दलातील स्क्वाड्रन लीडर सान्या ठरल्या पहिल्या महिला ‘कॅटेगरी-ए QFI’
भारतीय हवाई दल (Indian Air Force )मध्ये स्क्वाड्रन लीडर सान्या यांनी प्रतिष्ठित ‘कॅटेगरी-ए क्वालिफाइड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ (QFI) ही पात्रता मिळवून इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणाऱ्या त्या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
स्क्वाड्रन लीडर सान्या यांच्या या यशामुळे भारतीय हवाई दलाच्या इतिहासात आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, देशभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ही प्रतिष्ठित पात्रता मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण, उत्कृष्ट उड्डाण कौशल्य आणि उच्च दर्जाची व्यावसायिक क्षमता आवश्यक असते. सान्या यांनी आपल्या समर्पण, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर हा मान मिळवत महिला अधिकाऱ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी देशातील युवा वैमानिकांसाठी तसेच महिला अधिकारी वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे. भारतीय हवाई दलात महिलांची वाढती भूमिका आणि नेतृत्व क्षमता अधोरेखित करणारा हा अभिमानास्पद क्षण मानला जात आहे.