स्थायी समितीवरून राजकीय रणकंदन

0
43
स्थायी समितीवरून राजकीय रणकंदन
स्थायी समितीवरून राजकीय रणकंदन

स्थायी समितीवरून राजकीय रणकंदन

कणकवली नगरपंचायतीतील स्थायी समितीच्या निवडीदरम्यान ‘ईश्वर चिठ्ठी’ पद्धतीचा अवलंब करत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वादंग निर्माण झाला असून नगरपंचायतीच्या सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवली l प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीसाठी बोलावण्यात आलेली विशेष सभा मंगळवारी अक्षरशः गाजली. समसमान मतदानानंतर ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्याची वेळ येताच सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. चिठ्ठीत विषय समिती स्थापन न करण्याचा निर्णय निघाल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

पीठासीन अधिकारी गौरी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. प. पू. भालचंद्र सभागृहात सभा पार पडली. विषय समित्या गठीत करण्याबाबत सत्ताधारी गटाने लेखी विरोध नोंदवला, तर विरोधी गटाने समित्या स्थापन करण्याची जोरदार मागणी केली. अखेर हात उंचावून मतदान घेण्यात आले. मतदानात दोन्ही बाजूंना समान मते मिळाल्याने ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्यात आली. त्यातून विषय समिती स्थापन होणार नाही, असा निर्णय जाहीर झाला.

यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी स्थायी समिती स्थापन करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. यावर विरोधकांनी सदस्य निवडीबाबत प्रश्न उपस्थित करत तीव्र आक्षेप घेतले. नगराध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष, उपनगराध्यक्ष सदस्य आणि उर्वरित सदस्य सभागृहातून निवडण्याचा अधिकार असल्याचे गौरी पाटील यांनी सांगितले.

सभेत नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते राधाकृष्ण उर्फ रुपेश नार्वेकर, सुप्रिया नलावडे, बंडू हर्णे, संजय कामतेकर, मेघा गांगण, बाळू पारकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लूकेश कांबळे, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, राकेश राणे, स्वप्निल राणे, आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर आदींसह नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

विषय समित्या नसताना स्थायी समिती कशी स्थापन करणार, असा सवाल नगरसेवक बंडू हर्णे यांनी उपस्थित केला. सुप्रिया नलावडे, संजय कामतेकर, मेघा गांगण यांनी हा निर्णय कायद्याला धरून नसल्याचा आरोप करत विरोध दर्शविला. “आम्हाला तुमच्या स्थायी समितीत सहभागी व्हायचे नाही. नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांनीच कारभार चालवावा,” असा रोखठोक इशारा विरोधकांनी दिला.

यावर सत्ताधारी गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले. “आम्ही तुम्हाला स्थायी समितीत घेण्यास तयार असताना विनाकारण विरोध का?” असा सवाल उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी उपस्थित केला. सभागृहाच्या निर्णयाला न जुमानणे ही अडवणूक असल्याचा टोला त्यांनी लगावला. गटनेते रुपेश नार्वेकर व स्वीकृत नगरसेवक बाळू पारकर यांनीही विरोधकांचे आरोप फेटाळून लावले.

तणाव वाढत असताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मध्यस्थीचा प्रयत्न करत सत्ताधारी-विरोधक प्रत्येकी एक सदस्य व एक सदस्य चिठ्ठीद्वारे निवडण्याचा प्रस्ताव

(पान ४ वर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here