स्पेशल ऑलिंपिक्स भारत राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राची दिमाखदार कामगिरी
पुणे l प्रतिनिधी
हरियाणातील रोहतक येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या स्पेशल ऑलिंपिक्स भारत राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या दिव्यांग खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. देशातील २७ राज्यांमधील सुमारे ५१० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र संघाची ठळक कामगिरी
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत राज्याचा मान उंचावला.
-
- शितल परते – २०० मीटर (सुवर्ण), ४०० मीटर (सुवर्ण), 4×100 मीटर रिले (सुवर्ण)
- दीपाली पवार – स्पॉट जंप (सुवर्ण), जॅव्हलिन थ्रो (सुवर्ण)
- भूमी भानुशाली – शॉटपुट (सुवर्ण), 4×100 मीटर रिले (सुवर्ण), २०० मीटर (५ वा क्रमांक)
- सारिका गावंडे – ४०० मीटर (रौप्य), 4×100 मीटर रिले (सुवर्ण), २०० मीटर (४ था क्रमांक)
- पूनम पवार – लाँग जंप (सुवर्ण), शॉटपुट (४ था क्रमांक)
- सुमन शाहा – ४०० मीटर (सुवर्ण), २०० मीटर (कांस्य), 4×100 मीटर रिले (सुवर्ण)
- रुपाली – SLJ (सुवर्ण), १०० मीटर (कांस्य)
- लक्ष्मी मौजे – SLJ (रौप्य), १०० मीटर (४ था क्रमांक)
- मानसी मोरे – १०० मीटर (रौप्य), जॅव्हलिन थ्रो (कांस्य)
- सिद्धीका पाटील – १०० मीटर (रौप्य), जॅव्हलिन थ्रो (रौप्य)
- जयसिंग यादव – ८०० मीटर (सुवर्ण), ४०० मीटर (रौप्य)
- बाबू – ५,००० मीटर (रौप्य), ३,००० मीटर (४ था क्रमांक)
- अखिलेश बोरकर – १,५०० मीटर (कांस्य), ३,००० मीटर (५ वा क्रमांक)
- विजयकांत यादव – ३,००० मीटर (६ वा क्रमांक), ५,००० मीटर (४ था क्रमांक)
-
-
- मयुरेश कोटतीयन – १०० मीटर (सुवर्ण), जॅव्हलिन थ्रो (कांस्य)
- सचिन काळे – स्पॉट जंप (कांस्य), १०० मीटर (६ वा क्रमांक)
- आयुष दुधम – जॅव्हलिन थ्रो (रौप्य), १०० मीटर (७ वा क्रमांक)
- मनीष मात्रे – २०० मीटर (८ वा क्रमांक), ४०० मीटर (सहभाग)
- संदेश वाघे – लाँग जंप (४ था क्रमांक), २०० मीटर (८ वा क्रमांक)
- अर्जुन वारे – लाँग जंप (रौप्य), २०० मीटर (५ वा क्रमांक)
-
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली. त्यांच्या या दैदीप्यमान कामगिरीमुळे संपूर्ण राज्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
सर्व विजेत्या आणि सहभागी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.


