स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचे पुरस्कार जाहीर; मुंबई विभागात रत्नागिरी बसस्थानक प्रथम
मुंबई, प्रतिनिधी : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर राबविण्यात आलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत सन २०२५-२६ वर्षातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून मुंबई विभागातून Ratnagiri Bus Stand बसस्थानकाने प्रथम क्रमांक मिळवत मानाचा बहुमान पटकावला आहे.
राज्यभरातील बसस्थानकांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभियानामुळे बसस्थानकांमध्ये स्वच्छता, सुशोभीकरण, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
राज्यस्तरीय निकालानुसार ‘अ’ वर्गात पुणे विभागातील बारामती बसस्थानकाने (Baramati Bus Stand ) ९७ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. भंडारा विभागातील लाखणी बसस्थानकाने ‘ब’ वर्गात (Lakhani Bus Stand) ९७ गुणांसह अव्वल स्थान पटकावले, तर ‘क’ वर्गात अहिल्यानगर विभागातील अकोले बसस्थानकाने (Akole Bus Stand) ९८ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रादेशिक विभागनिहाय निकालात छत्रपती संभाजीनगर विभागातीलvनिकालात छत्रपती संभाजीनगर विभागातील औरसा नवीन (Aursa New Bus Stand), मुंबई विभागातील रत्नागिरी (Ratnagiri Bus Stand), नागपूर विभागातील चंद्रपूर (Chandrapur Bus Stand), पुणे विभागातील बारामती (Baramati Bus Stand), नाशिक विभागातील सटाणा (Satana Bus Stand) आणि अमरावती विभागातील उमरखेड (Umarkhed Bus Stand)
मुंबई विभागातील , नागपूर विभागातील पुणे विभागातील , नाशिक विभागातील आणि अमरावती विभागातील यांनी आपल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या अभियानामुळे राज्यातील बसस्थानके अधिक स्वच्छ, आकर्षक आणि प्रवासी-केंद्रित बनण्यास मदत झाली असून एसटी महामंडळाच्या सेवांबाबत प्रवाशांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.